
चंद्रपूर : दि.22.05.2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे चिमूर हद्दीतील मौजा चिमूर नाला येथून अवैध्यरित्या गौण खनिज चे चोरटे उत्खनन करून वाहतूक करीत असल्याचे मुखबीर खबरे वरून छापा टाकून सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध पो.स्टे. चिमूर येथे अप.क्र. 517/26 कलम – 303(2) , 49 BNS, R/W 48(7),48(8) जमीन महसूल कायदा , R/W 177 M.V.ACT अन्वये गुन्हा नोंद करण्यात आली असून आरोपी बापुराव आत्माराम चव्हाण, वय 28 वर्ष रा. शिवापूर बंदर, तह. चिमूर, जि. चंद्रपूर,याला ताब्यात घेतले आहे तर आरोपी – बबलू जाधव, राह. चिमूर हा फरार आहे त्याचा शोध पोलीस करीत आहे.
विना क्रमांकाचे ट्रॉली सह असलेला ट्रॅक्टर क्र. 5,00,000/- रु., एक ब्रास रेती की. 5,000/- रु. एकूण किंमत : 5,05,000/- रु. माल जप्त करण्यात आले आहे.
सदर कारवाई उप विभाग चिमूर पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरयांनी केली आहे