
चंद्रपूर : आज दिनांक ०६/११/२०२६ रोजी पोलीस स्टेशन कोठारी हद्दीत गोपनीय बातमीच्या आधारे बल्लारशाह कोठारी रोडवरील सातबारा हॉटेल जवळ पोलिस स्टेशन कोठारी व स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकाने संयुक्तरीत्या नाकाबंदी करून ट्रक क्रमांक MH34AB5592 चे चालकास थांबण्यास सांगितले असता नमूद ट्रक चालकाने ट्रक न थांबवता तो पळून जाऊ लागला व थोड्या अंतरावर ट्रक थांबवून ट्रक सोडून पळून गेला.
कायदेशीर कलम ६५ (अ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, सहकलम 179(1) Mv act जप्त मुद्देमाल १. देशी दारू: रॉकेट संत्रा कंपनीची देशी दारू 39 पेट्या (3900 नग, ९० एमएल) – किंमत ₹१,५६,०००/- २. वाहन: ट्रक क्र. MH34AB5592 किंमत ₹१५,००,०००/- एकूण जप्त मुद्देमाल किंमत: ₹१६,५६,०००/- आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन कोठारी येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सदर कारवाई उपविभाग राजुरा पथक व पोलिस स्टेशन कोठारी यांनी केली आहे.