
चंद्रपूर : पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत एमआयडीसी खुटाळा परिसरातून ३३२ नग घरगुती सिलिंडर, १० नग कमर्शियल सिलिंडर आणि अशोक लेलंड कंपनीचा ट्रक (क्र. MH 34 BG 1600) चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली होती. याप्रकरणी फिर्यादी वैभव विनोद खांडरे (वय ४२ वर्षे, रा. समाधी वार्ड, जेल रोड, चंद्रपूर), जे गॅस सिलिंडर ट्रान्सपोर्टिंगचा व्यवसाय करतात, त्यांनी तक्रार दाखल केली होती. दि. १२/०७/२०२६ रोजी त्यांचा गॅस सिलिंडरने भरलेला निळ्या रंगाचा अशोक लेलंड ट्रक (अंदाजे एकूण किंमत २१,१४,०००/- रुपये) एमआयडीसी खुटाळा येथील गॅस बॉटलींग प्लांटसमोरील रोडवरून अज्ञात चोरांनी चोरून नेला होता. याप्रकरणी पडोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवून गुन्ह्याचा तपास युद्धपातळीवर सुरू करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा (LCB), चंद्रपूर आणि पडोली पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलीस तपासादरम्यान, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यात खालील तीन आरोपींचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले आहे:
१) राजेंद्र रामचंद्र काळे (वय ३२ वर्षे, रा. वांढरी फाटा, पडोली, चंद्रपूर)
२) कुणाल सुभाष घुरुडे (वय २७ वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, दातळा, चंद्रपूर)
३) मोहीत पोतदार (रा. मुलचेरा, जिल्हा गडचिरोली)
पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळून केलेल्या सखोल चौकशीनंतर त्यांच्या ताब्यातून चोरीचा बहुतांश मुद्देमाल आणि सिलिंडर बेकायदेशीररित्या विकून जमा केलेली रोकड रीतसर जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
१) गॅसने पूर्ण भरलेले घरगुती सिलिंडर (१४.२ किलो, HP कंपनी) ८२ नग
२) रिकामे घरगुती सिलिंडर (१४.२ किलो, HP कंपनी) २५० नग
३ ) गॅसने पूर्ण भरलेले कमर्शियल सिलिंडर (१९ किलो, HP कंपनी)
१० नग
४) चोरीचे सिलिंडर बेकायदेशीररित्या विकून जमा केलेली रोकड रक्कम
२,४७,०००/- रुपये
सदर यशस्वी व धडाकेबाज कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली, तसेच माननीय पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर) श्री. अमोल काचोरे यांच्या थेट नेतृत्वात
सपोनि. योगेश विसे, सपोनि. दीपक कंकरेद्वार, पोउनि. विनोद भुरले, पोउनि. सुनील गौरकार, पोउनि. देवानंद केकान (पो.स्टे. पडोली), पोहवा सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनिकांत पुष्ठावार, दीपक डोंगरे, इमान खान, शरद कुडे, पोअं हिरालाल गुप्ता, संदीप कांबडी, किशोर वाकाटे आणि शशांक बदामवार यांनी केली.