
चंद्रपूर : दि. 10.10.2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पोस्टे रामनगर हद्दीत अवैधरित्या गौण खनिजाचे चोरटे वाहतूक करीत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने नाकाबंदी करीत कारवाई करण्यात आली. सदर कारवाईदरम्यान आरोपी नविनकुमार महाबीर सिंग, वय 40 वर्ष, रा. फुलूटोला तफरदे, तालुका पुरेनी बाजार जिल्हा मधेपुरा रा. विरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन रामनगर येथे अप क्र. 1173/26 कलम 303(2), बीएनएस, R/W 48(7), 48(8) जमीन महसूल कायदा R/W 177 मो. वा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आली असून वाहिद झबीर शेख, रा. उमरेड जिल्हा नागपूर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
महेंद्र कंपनीचा 16 चक्का पल्ला गाडी क्र. MH 40 CV 9333 किंमत अंदाजे : 40,00,000/- ₹. व 10 ब्रास रेती किंमत अंदाजे : 60,000/- ₹. एक जुना वापरता मोबाईल किंमत 10,000/- ₹ एकूण 40,70,000/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई उपविभाग राजुरा पथक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.