
चंद्रपूर : दि.०३/०६/२०२६ रोजी अवैध धंदयावर कार्यवाही करणेकामी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार मुल शहरात पेट्रोलींग करीत असतांना गुप्तबातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, संजुसिंग संतोषसिंग पटवा, वय २४ वर्ष, रा. वॉर्ड नं.१७, ताडाळा रोड, मुल जि. चंद्रपूर याचे राहते घरी विना परवाना भरमार बंदुक लपवुन ठेवल्या आहे, अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस स्टेशन मुल येथील अधिकारी व अंमलदार यांनी पंचासह रेड केली असता नमुद इसमाचे राहते घरी दोन भरमार बंदुका अग्निशस्त्र अंदाजे किं. २०,०००/- गावठी बनावटीच्या विनापरवाना मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आले. नमुद आरोपीने विनापरवाना दोन भरमार बंदुका अग्निशस्त्र गावठी बनावटीच्या घरी ताब्यात बाळगल्याने आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन मुल भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३,२५ अन्वये गुन्हा नोदं करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस स्टेशन मुल करीत आहे.
सदरची कार्यवाही मा.श्री. आयुष नोपानी, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर व मा.श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, श्री. सत्यजित आमले, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कार्यवाही श्री. अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व श्री. विजय राठोड, पोलीस निरीक्षक, मुल यांचे नेतुत्वात संतोष निंभोरकर पोउपनि, विनोद भुरले पोउपनि, रूपेश कुंभरे पोउपनि, पोलीस अंमलदार धनराज करकाडे, चेतन गज्जलवार, सुरेद्र महतो, सुमित बरडे, प्रफुल्ल गारघाटे, मिलिंद टेकाम, नरेश कोडापे, संदिप चुदरी, पुजा मेश्राम यांनी केली.