
चंद्रपूर : ‘ऑपरेशन शोध-4’ अंतर्गत LCB/AHTU पथकाने 01 वर्षांपासून पळविलेल्या बालिकेचा व आरोपीचा यशस्वी शोध लावला आहे.
पोलीस स्टेशन चिमूर येथे अप. क्र. 41/2025, कलम 137(2) BNS अन्वये दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान संशयिताच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तपासादरम्यान संबंधित मोबाईल क्रमांक मौजा गुंमथळा, ता. कामठी , जिल्हा नागपूर येथे कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर प्राप्त CDR व इतर तांत्रिक माहितीचे सखोल विश्लेषण करण्यात आले.
विश्लेषणातून पीडित बालिका व संशयित सरगम केशव बावणे (वय 25 वर्षे), रा. मोटेगाव, ता. चिमूर हे नागपूर येथे राहत असल्याची प्राप्त माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ कारवाई करत दोघांना दि.15/06/26 रोजी मौजा गुंमथळा, ता. कामठी , जिल्हा नागपूर येथून ताब्यात घेतले.
त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई व तपासकामी दोघांना पोलीस स्टेशन चिमूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाईमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणात महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.
सदर कारवाई AHTU/LCB व सायबर सेल, पथक चंद्रपूर यांनी केली आहे.