
चंद्रपूर : दि.07.07.2026 रोजी पोलीस स्टेशन वरोरा येथील हुडकी (चिनोरा) येथे अवैधरित्या विनापरवाना लोखंडी धारदार तलवार बाळगून असलेल्या इसमावर छापा टाकून सदर प्रकरणी विधिसंघर्षग्रस्त बालक वय 17 वर्ष रा. हुडकी (चिनोरा )तह. वरोरा विरुद्ध पो.स्टे. वरोरा येथे अप. क्र. 793/26 कलम 4, 25 भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई उपविभाग वरोरा पथक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.