
चंद्रपूर : दि. 22.05.2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील उपविभाग ब्रम्हपुरी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पोस्टे तलोधी हद्दीत अवैधरित्या गौण खनिजाचे चोरटे वाहतूक करीत असल्याचे प्राप्त माहिती वरून छापा कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई दरम्यान आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन – तळोधी येथे कलम 303(2),49, BNSS व जमीन महसूल कायदा आणि मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी आतिश परसराम मसराम राi.वलनी याला ताब्यात घेतलेले आहे तर ट्रॅक्टर मालक नामे सागर मेश्राम, राह. वलनी ता. नागभीड हा फरार आहे.
ट्रॅक्टर क्र. MH-34-BV-4189 चा रेती ने भरलेले दोन ट्रॉलिसह ट्रॅक्टर की.10,00000/-₹ अं.किं. 20,000/- ₹ दोन ट्रॅक्टर चे ट्रालीमधील रेती (गौण खनिज) 02 ब्रास असा एकूण 10,20,000/- रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई उपविभाग ब्रम्हपुरी पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.