
चंद्रपूर : दि. 21.05.2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील उपविभाग मुल पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पोस्टे रामनगर हद्दीत अवैधरित्या गौण खनिजाचे चोरटे वाहतूक करीत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने छापा कारवाई करण्यात आली. सदर कारवाईदरम्यान आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे कलम 303(2) बीएनएस, जमीन महसूल कायदा आणि मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आली असून आरोपी देवानंद मारुती सोमणकर, वय 36 वर्ष, रा. गडचिरोली आणि वाहन मालक बिट्टू उर्फ हरीश सय्यद राहणार चंद्रपूर यांना ताब्यात घेतले आहे.
अशोक लेलँड कंपनीचा हायवा ट्रक क्र. MH 34 CQ 7878 किंमत अंदाजे : 40,00,000/- रुपये 10 ब्रास रेती किंमत अंदाजे : 70,000/- रुपये असा एकूण 40,70,000/- रुपयेचा माल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई उपविभाग मुल पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.