
चंद्रपूर : दि. 8/ 9/ 2026 रोज सोमवार ला भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेच्या वतीने चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा. प्रशांतभाऊ निमकर यांच्या नेतृत्वात आर. टी. ओ. कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
परिवहन विभागाने नवीन कार्याप्रणालीनुसार ज्या अटी वाहन खरेदी विक्री करतांना लादल्या आहेत त्यानुसार गाड्यांची खरेदी विक्री करणे खूप कठीण झाले असून या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ येत आहे. या व्यावसायिकांचे व त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण याच व्यवसायावर असून त्यांचा उदरनिर्वाह होणे कठीण झाले आहे. हे सर्व व्यावसायिक देशहीत व सामाजिक बांधिलकी जपत आपला व्यवसाय करीत असून आवश्यक वेळी सर्वोतोपरी धावून येत असतात याचेच उदाहरणं म्हणजे..
मोर्चा आर. टी. ओ. ऑफिस जवळ आला त्यावेळेस एका खाजगी वाहनात एका महिलेला उपचारासाठी घेऊन जात असतांना ट्रॅफिक जाम झाली होती अशावेळी याचं व्यावसायिकांनी मोर्चा थांबवून ट्रॅफिक सुरळीत करून त्या रुग्ण महिलाच्या गाडीला वाट मोकडी करून दिली. सामाजिक जाणीव व देशहीत जोपसणाऱ्या व्यवसायिकांवर आज परिवहन विभागाचा जाचक अटीमुळे व्यवसाय करणे कठीण झाले आहे.
जिल्हाध्यक्ष मा. प्रशांतभाऊ निमकर यांनी आर. टी. ओ. अधिकारी मा. लोही साहेब यांच्याशी चर्चा करतांना आपली भूमिका ठामपणे मांडत त्यांना वेठीस धरले प्रत्येक नियामामुळे कोणती अडचण येत आहे याची मुद्देसूद मांडणी करून समजावून सांगितले यावर RTO अधिकारी यांनीही ते मान्य केले. बऱ्याच बाबी ह्या RTO अधिकारी यांना माहीतच नव्हत्या त्यांनी आपल्या सहकार्यकडून त्याची विचारणा केली ही बाब चर्चा करतांना दिसून आली.
जिल्हा उपाध्यक्ष हकीम हुसैन यांनी सुद्धा RTO अधिकारी यांना काही उदाहरणं देत जाचक अटीमुळे काय नुकसान होत आहे हे समजावून सांगितले व ते RTO अधिकाऱ्यांनी मान्यही केले. AU SMALL FINANCE चे प्रतिनिधी मा. सुरज देवगडे यांनी ही या जाचक अटीमुळे फायनान्स करतांना काय अडचण निर्माण होत आहे याची माहिती दिली RTO अधिकारी यांनी त्यांच्या सूचना समजून घेतल्या.
चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा. प्रशांतभाऊ निमकर यांनी धाडसी आणि मुद्देसूद केलीली मांडणी हे चर्चेला यशस्वी करण्यात कारणीभूत ठरली. जिल्हाध्यक्ष मा. प्रशांतभाऊ निमकर यांची धाडसी भूमिका मांडत RTO अधिकारी यांच्या कडून
१) HP चढवण्यासाठी बिफोर करणे बंद केले
२) बिफोर करण्याच्या वेळेत बदल करून देण्यात आले.
३) RC मध्ये नाव दुरुस्ती व पत्ता दुरुस्ती करून दिल्या जाईल.
ह्या मागण्या मान्य करून घेतल्या. बऱ्याच मागण्या ह्या NIC च्याच मार्फत दुरुस्त केल्या जाऊ शकतात त्यामुळे त्यात सहयोग करू शकतं नाही असे RTO अधिकारी यांनी सांगितले
भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष मा. प्रशांतभाऊ निमकर, जिल्हा सचिव मा. नासिर शेख, जिल्हा उपाध्यक्ष हकीम हुसैन, जिल्हा सहसचिव निलेश मोहोड, महानगर अध्यक्ष मा. नासिर खान यांनी मोर्चा यशस्वी होण्याचे श्रेय जिल्हातील सर्व पदाधिकारी व सदस्य यांना देऊन आभार मानले.
