
चंद्रपूर : दि.27/08/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस स्टेशन दुर्गापूर हद्दीतील ताज स्क्रॅप येथे कारवाई करून चोरी करून आणल्याचा संशय असलेला ॲल्युमिनियम तार, लोखंडी सलाखी, इलेक्ट्रिक पोल व डी.पी.चे लोखंडी साहित्य असा एकूण ₹1,32,250/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .
सदर प्रकरणी प्रमोद रामलाल सूर्यवंशी, वय 47 वर्षे, रा. नेरी, दुर्गापूर यास संशयित मुद्देमालासह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीनंतर पुढील तपासकामी पोलिस स्टेशन दुर्गापूर यांच्या ताब्यात देण्यात आले.याप्रकरणी पोलिस स्टेशन दुर्गापूर येथे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई उपविभाग मूल/चंद्रपूर शहर पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर केली आहे.