
चंद्रपूर : दि.17.06.2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पो.स्टे. रामनगर हद्दीतील मौजा. थेरगाव तालुका पोंभुर्णा नदी पत्रातून अवैध्यरित्या गौण खनिज चे चोरटे उत्खनन करून वाहतूक करीत असल्याचे मुखबीर खबरे वरून छापा टाकून सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध पो.स्टे. रामनगर येथे अप.क्र. /26 कलम – 303(2) BNS, R/W 48(7),48(8) जमीन महसूल कायदा ,अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
1.आरोपी – ईश्वर सोहनलाल बैरिया वय 30 वर्ष पत्ता संजय नगर चंद्रपुर
जप्त माल :
1)एक अशोक लेलँड हायवा ट्रक क्रमांक M H 49 BZ 5157 40,00,000/- रु.
2)04 ब्रास रेती की.28,000/- रु. एकूण जप्त माल किंमत : 40,28,000/- रु.
सदर कारवाई गणेश भोयर, किशोर वैरागडे, अजय बागेसर, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.