
चंद्रपूर : पोलीस स्टेशन वरोरा येथे दाखल अप क १०६७/२०२६ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता अन्वये नोंद असलेल्या कापुस चोरीच्या गुन्हयातील अज्ञात आरोपी व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेत असतांना दि. ०१/११/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, हिंगणघाट जि. वर्धा येथील १) सागर लक्ष्मण चव्हाण वय २९ वर्षे रा. नागरी ता. वरोरा जि. चंद्रपुर २) अमोल महादेव जाधव वय २२ वर्षे रा. दहेगाव सेलु ह.मु हिंगणघाट जि. वर्धा व ०१ विधीसंघर्षग्रस्त बालक यांनी मिळुन हि चोरी केलेली आहे.
वरील तिघांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन गुन्हयात चोरी केलेला कापसापैकी २.५ क्विटल कापुस किमती २३,००० रुपये व कापुस चोरी करण्याकरिता वापरण्यात आलेली झायलो कंपनीची गाडी किमती ५,००,००० रुपये असा एकुण ५.२३,००० रुपयाचा मुदद्वेमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन वरोरा येथे सुरु आहे.
सदरची कार्यवाही मा.श्री. आयुष नोपानी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा.श्री. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्री. अमोल काचोरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांचे नेतुत्वात सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोहवा रजनीकांत पुठ्ठावार, पोहवा सचिन गुरनुले, पोहवा सुभाष गोहोकार, पोअं विठ्ठल काकडे, पोशी/दिनेश अराडे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.