
चंद्रपूर : दि.१६/०६/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांना गुप्तबातमीदाराकडुन माहिती मिळाली की, इसम नामे तोहिद शेख, रा. वॉर्ड नं.१४ मुल याने स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेला सुगंधित तम्बाकु व पानमसाला विक्री करीता बाळगला आहे तसेच घरी बनावट सुगंधित तंबाखु तयार करीत आहे, अशी खात्रीशीर खबर मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस स्टेशन मुल येथील अधिकारी/अंमलदार यांनी रेड केली असता आरोपी नामे मोहम्मद तोहिद मोहम्मद आरिफ, वय २७ वर्ष, रा. वॉर्ड नं.१७ ताडाळा रोड, मुल ता. मुल, जिं. चंद्रपूर याचे राहते घरी बनावट सुगंधित तंबाखु तयार करण्याचे साहित्य, मशीन व महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेला तंबाखु व पानमसाला साठा, वाहतुकसाठी वापरलेली कार कंमाक एमएच-२७ बीव्ही-२९०७ असा एकुण ९,८५,४४५/-रू चा माल जप्त करण्यात आला आहे.
पुढील कार्यवाहीकामी आरोपी व जप्त मुद्देमाल अन्न व औषध प्रशासन चंद्रपूर यांचे ताब्यात देण्यात आले असुन त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीस गुन्हयात अटक करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस स्टेशन मुल करीत आहे.
सदरची कार्यवाही मा.श्री. आयुष नोपानी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा.श्री. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्री. सत्यजित आमले, उपविभागीय पोलीस अधिकारी मुल यांचे मार्गदर्शनात श्री. अमोल काचोरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व श्री. विजय राठोड पोलीस निरीक्षक, मुल यांचे नेतुत्वात पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि रूपेश कुंभरे, पोलीस अंमलदार धनराज करकाडे, जंयत चुनारकर, चेतन गज्जलवार, सुरेद्रं मंहतो, सुमित बरडे, प्रफुल्ल गारघाटे, किशोर वाकाटे, दिपीका सोडणार व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी कारवाई केली आहे.