
चंद्रपूर : आज दिनांक ०४/०८/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पो.स्टे. पडोली हद्दीत नाकाबंदी करण्यात आली. यावेळी १० चक्का टाटा ट्रक (MH 31 CV 0817) अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ट्रक न थांबवता भद्रावतीच्या दिशेने पळ काढला. पथकाने तात्काळ पाठलाग करून सब स्टेशन पावर ग्रेड, जुना सुमठाणा, भद्रावती येथे ट्रक ताब्यात घेतला.
सदर ट्रकमधून ३५ गोवंश (३१ गायी व ४ बैल) यांची अवैध वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. कारवाई दरम्यान चालक व क्लिनर अशा दोन आरोपींना ताब्यात घेऊन १० चक्का ट्रक, ३५ गोवंश व २ मोबाईल हँडसेट असा एकूण ₹२२.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी १) भुषण ओमकार तरारे (वय २४ वर्षे), रा. आझादनगर, कामठी, नागपूर. २) सयद जसिन सयद असलम (वय ३३ वर्षे), रा. ताजबाग चौक, नागपूर.यांना ताब्यात घेतले असून राकेशकुमार यावकराम टेकाम व मोसिन हे दोन आरोपी फरार आहेत पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याप्रकरणी पोलीस स्टेशन भद्रावती येथे प्राण्यांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६० चे कलम ११(१)(घ)(ड)(च)(ज), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ चे कलम ९(अ), ९, ११ तसेच बीएनएस, २०२३ चे कलम ३(१), ४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर उपविभाग पथक यांनी केली आहे.