
ब्रम्हपुरी (प्र) : दि. 08.09.2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, गांगलवाडी मार्गे पाथरीकडे अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती.
सदर माहितीच्या आधारे पो.स्टे. ब्रम्हपुरी हद्दीतील मौजा कुडेसावली येथे सापळा रचून छापा टाकण्यात आला. आरोपी सुनिल रमेश नरुले,विपुल तानाबा मेश्राम व त्यांच्या ताब्यातील कार मधून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करताना मिळून आले.तर एक आरोपी हरभजनसिंग सतनाम सिंग फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
याप्रकरणी पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे अप. क्र. 701/26, कलम 65(अ), 83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जप्त मुद्देमाल :
१) 1,60,000/- रु. किमतीच्या एकूण 40 पेट्या (4000 नग) 90 ml क्षमतेच्या देशी दारूच्या सीलबंद बाटल्या
२) 4,00,000/- रु. किमतीची दारू वाहतुकीसाठी वापरलेली FORD FIGO कंपनीची कार क्र. MH 31 BK 9242
एकूण जप्त मालाची किंमत : 5,60,000/- रु.
सदर कारवाई उपविभाग ब्रम्हपुरी पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.