
चंद्रपूर : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि चंद्रपूरकर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शनिवार दिनांक 09 मे 2026 ला सायंकाळी 6.30 वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात, चंद्रपूर येथे ‘बुवा तेथे बाया’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा.शाम मानव प्रमुख वक्ते असून खासदार प्रतिभाताई धानोरकर अध्यक्षस्थानी राहतील. उद्घाटन आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते होईल तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे,राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांचे प्रमुख उपस्थिती राहील.
सध्या गाजत असलेले भोंदू खराब बाबा प्रकरण, बुवाबाजी आणि महिलांची फसवणूक व शोषण आदी विषयांवर प्रा. श्याम मानव सविस्तर प्रकाश टाकणार आहेत. या महत्त्वपूर्ण व्याख्यानाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अनिल दहागावकर,सचिव धनंजय तावाडे,कार्याध्यक्ष प्रदीप अडकीने,महिला संपर्क प्रमुख रजनी कार्लेकर, जिल्हा सहसचिव अनिल लोनबले,युवा संपर्क प्रमुख निखिलेश चामरे,कोषाध्यक्ष विजय भोगेकर, पौर्णिमा बलवीर,अविनाश आंबेकर नंदू सोनारकर यांनी केले आहे.