
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीला आळा घालण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक यांनी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने माननीय पोलीस निरीक्षक, स्थागुशा चंद्रपूर अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे पथक वरोरा परिसरात गस्तीवर असताना पथकाला खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की, नागपूर येथील एक इसम मोठ्या प्रमाणात ‘एमडी’ ड्रग्जची विक्री करण्यासाठी चंद्रपूर येथे येणार आहे. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पथकाने पोलीस स्टेशन वरोरा हद्दीतील खंबाळा शिवारात अत्यंत शिताफीने सापळा रचला. संशयास्पदरित्या मोपेडवरून आलेल्या इसमास थांबवून त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्याकडे १०१ ग्रॅम एमडी (MD) ड्रग्ज पावडर मिळून आली. आरोपीने हा माल नागपूर व चंद्रपूर येथील साथीदारांच्या मदतीने विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी अमित कृष्णा गजभिये (वय २३ वर्षे), रा. इंदोरा, नागपूर असून त्याच्या सोबतचे दोन साथीदार १) हर्षल टेंभेकर, रा. इंदौरा, नागपूर २) सोहेल शेख (सोहेल SK), रा. चंद्रपूर हे फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल : एमडी (MD) ड्रग्ज पावडर (एकूण वजन १०१ ग्रॅम) १५,००,०००/- रुपये , मोबाईल फोन (०१ नग) ११०,०००/- रुपये , मोपेड वाहन (क्र. MH 31 FH 2049) १८०,०००/- रुपये एकूण १५, ९०००० /- रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
सदर आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन वरोरा येथे NDPS Act कलम 8 (क), 22 (क) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची यशस्वी कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक आयुष नोपानी (भा.पो.से.), माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे आणि माननीय पोलीस निरीक्षक (LCB) अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवधरे, रजनिकांत पुष्ठावार, दिपक डोंगरे, इम्रान छान, पॉर्ज हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार (LCB चंद्रपूर), पोहवा कार्तिक खनके, पो. अ. अनिमेश भोंगळे व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी केली आहे.