
चंद्रपूर : आज दि.०३/०५/२०२६ रोजी पोलीस स्टेशन मुल ता.जि. चंद्रपूर गु.र.नं -३९३/२०२६ कलम ३३१(३),३३१ (४),३०५ भारतीय न्याय संहिता हा गुन्हा पोलीस रेकॉर्डवरिल आरोपी अमोल इलमकर रा. दुर्गापूर याने केला असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झालेवरून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पथकाने आरोपीस ताब्यात घेवुन तांत्रिक विश्लेषाचे आधारे आरोपीस विचारपुस केली असता आरोपीने गुन्हा केल्याचे निवेदन देवुन नमुद गुन्हयातील चोरीस गेले १०५ ग्रॅम सोन्याचे दागिने पंचासमक्ष काढुन दिल्याने जप्त करण्यात आले. तसेच पोलीस स्टेशन घुग्गुस गु.र.नं १४८/२०२६ कलम ३३१(३),३३१ (४),३०५ भारतीय न्याय संहिता मधील चोरीस गेले चांदीचे दागिन्यापासुन बनविलेली लगड वजन १ किलो ४११ ग्रॅम अशी आरोपीचे सांगणेनुसार एका महिलेकडुन जप्त करण्यात आली आहे. आरोपीकडे आणखी सखोल विचारपुस केली असता पोलीस स्टेशन मुल येथे मंदिरात झालेली चोरी अनुषंगाने दाखल असलेला गु.र.नं ३३२/२०२६ कलम ३३१(३),३३१(४),३०५ भारतीय न्याय सहिता अन्वये गुन्हा केला असल्याचे उघड झाले आहे. आरोपीकडुन गुन्हयात वापरलेली मोटरसायकल यामाहा आर वन जप्त करण्यात आली आहे. आरोपीकडुन तीन घरफोडीचे गुन्हे उघड झाले असुन आरोपीकडून सोने व चांदी दानिगे, मोटरसायकल व मोबाईल असा एकुण १७,७८,२२६/-रू चा माल जप्त करण्यात आला असुन आरोपीस पुढील तपासकामी पोलीस स्टेशन मुल यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा.श्री. आयुष नोपाणी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्री. अमोल काचोरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांचे नेतुत्वात बलराम झाडोकार सहायक पोलीस निरीक्षक, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा/रजनीकांत पुटटावार, सचिन गुरनुले, संतोष येलपुलवार, गणेश मोहुर्ले, दिनेश आराडे, नितिन कुरेकर, नितिन साळवे, प्रमोद कोटनाके, सुरेद्र महतो, निराशा तित्तरे, उषा लेंडागे पोलीस अंमलदार प्रफुल्ल गारघाटे, शेखर माथनकर, अमोल सावे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी कारवाई केली आहे.