
चंद्रपूर : दिनांक ०७/०४/२०२६ रोजी मा. पोलीस अधिक्षक साहेब, चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर शहरात प्रोव्हीशन, जुगार रेड, मोटार सायकल चोरी व घरफोडी गुन्हयातील आरोपीतांना चेक तसेच अवैधरित्या जनावर वाहतुक करणा-यावर कारवाई करणे कामी रवाना चंद्रपुर शहर परिसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरचे खबरे वरून एम.ई. एल. नाका, मुल रोड, चंद्रपुर येथे ०२ टाटा कंपनीचे ट्रक मध्ये अवैधरित्या जनावर वाहतुक करणा-या ट्रकसह ६३ जनावराना ताब्यात घेवून एकूण ५८,२०,०००/- रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर घटनेसंबंधाने ०५ आरोपीना अटक करण्यात आली असुन एकुण ११ आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन, रामनगर येथे अवैधरित्या जनावर वाहतुक संबंधाने गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयात ताब्यात घेण्यात आलेले ६३ जनावरे सुरक्षेच्या दृष्टीने प्यार फाउंडेशन, छोटा नागपुर जि. चंद्रपुर येथे जमा करण्यात आले आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस स्टेशन, रामनगर हे करीत आहेत.
आरोपी नाव :- १) शेख हाशम शेख मोला, वय-२७ वर्ष, धंदा-चालक,
२) मोसिन बेग मुबारक बेग, वय-२९ वर्ष, दोन्ही. रा. जयमुर, ता. जि. आसिफाबाद (तेलंगना)
३) शेख अन्सारी अशरफ मिया, वय-३० वर्ष, धंदा-चालक, रा. मबडकीटांडा, ठाणा-बेगबाद, ता.
जि. गिरडीह, (झारखंड),
४) समीर खान करीब खान, वय-१८ वर्ष, रा. गडचांदुर, जि. चंद्रपुर,
५) शेख जुनेद साबीर हुसेन, वय-१९ वर्ष, रा. संतोषनगर, बैरमपुरा, जि. अहमदाबाद (गुजरात)
६) इम्रान कुरेशी, ७) सादीक कुरेशी, ८) आवेश कुरेशी, तिन्ही रा. गडचांदुर, जि. चंद्रपुर
९) सोहल रा. गोयगाव ता. राजुरा जि. चंद्रपुर
१०) वसीम कुरेशी, रा. रयतवारी कॉलरी, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर
जप्त माल:-
१) एक पांढ-या रंगाची चार चाकी वाहन क्रमांक टि.एस.०४ ई.यु. ५६२५ (पायलटींग)
२) ट्रक कंपनीचे ट्रक क्रमांक एम. एच. ३४ ए.व्हि. ०३७९
३) ट्रक कंपनीचे ट्रक क्रमांक टि.एस. ०७ यु. जी. ३६४५
४) आरोपीतांचे ५ मोबाईल
वरील प्रमाणे असा एकुण ५८,२०,०००/- रू
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, यांचे नेतृत्वात पोउपनि, विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार, पोलीस स्टॉफ पोहवा.नितीन साळवे, पोहवा.नितीन कुरेकार, पोहवा.सुभाष गोहोकार, पोहवा. सतिश अवथरे, पोहवा.रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा.दिपक डोंगरे, पोहवा.इम्रान खान, पोहवा. प्रमोद कोटनाके, पोअं.हिरालाल गुप्ता, पोअं.किशोर वाकाटे, पोअं.शशांक बदामवार, पोशि.प्रसाद धुलगंडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर तसेच पोहवा.कार्तीक खनके, पोअं.उमेश रोडे, पोस्टे सायबर, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.