
चंद्रपूर :- दिनांक ०५/०४/२०२६ रोजी फिर्यादी नामे मनिष गोपाल मुंधडा वय-४८ वर्ष, रा. दिक्षीत वार्ड, पंचशिल वार्ड, चंद्रपुर यांनी पोस्टे चंद्रपुर शहर येथे तक्रार दिली की, दिनांक ०४/०४/२०२६ रोजी यातील फिर्यादी हे नेहमी प्रमाणे सकाळी ०८:०० वाजता हॉस्पीटल मध्ये येवुन पेशंट तसेच रूग्णा तपासणी करून घरी गेले असता रात्रौ दरम्यान कोणी तरी अज्ञात इसम हॉस्पीटल कॅबिन मध्ये प्रवेश करून लाकडी आलमारी मधील ६०,०००/-रू. चोरी करून नेले अशा फिर्यादी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथे अप. क्रमांक, ४०२/२०२६ कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१ (४) भारतीय न्याय संहिता सन २०२३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले आहे.
वरील गुन्हयाचे गांभीर्य बघता, मा. पोलीस अधिक्षक साहेब, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना सदरच गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यावरून पो. नि. अमोल काचोरे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात पोउपनि विनोद भुरले, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी त्यांचे पथकासह रवाना होवुन मुखबिरचे खबर तसेच तांत्रिक पध्दतीने कौशल्यपुर्ण तपास करून आरोपी श्रीकांत उर्फ बोटतुटया राजु चुनारकर, वय-२३ वर्ष, रा. आनंदनगर, महाकाली कॉलरी, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन गुन्हयात चोरी गेलेली रक्कम जप्त करण्यात असून सोबत असलेला दुसरा आरोपी अतुल उर्फ मुजोर विकास राणा वय – 25 वर्ष रा. शामनगर, चंद्रपूर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सदर आरोपीस पुढील तपास कामी पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर यांचे ताब्यात देण्यात आले.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, यांचे नेतृत्वात पोउपनि, विनोद भुरले, पोउपिन सुनिल गौरकार, पोलीस स्टॉफ पोहवा. सुभाष गोहोकार, पोहवा.सतिश अवथरे, पोहवा. रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा. दिपक डोंगरे, पोहवा. इम्रान खान, पोअं. हिरालाल गुप्ता, पोअं.किशोर वाकाटे, पोअं.शशांक बदामवार, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.