
चंद्रपूर : दि.०३/०४/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन सावली येथील अधिकारी व अंमलदार यांचे पथक प्राप्त गोपनीय माहितीनुसार नागपूर येथे जावुन घरफोडी करणारा अटटल आरोपी शेठ उर्फ रमेश वेलादन शेटटी, रा.चंद्रपूर हल्ली रा.दिघोरी नागपूर यास नागपूर येथुन ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन सावली येथील पथकाने संमातर तपास करून आरोपीने दिलेल्या माहितीनुसार नागपूर येथील तीन सोनाराकडुन पोलीस स्टेशन सावली येथील अप कंमाक १०७/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१ (४) भारतीय न्यास संहिता, पोलीस स्टेशन मुल अप कंमाक २५२/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१ (४) भारतीय न्याय संहिता मधील चोरीस गेलेले व सोनाराकडे विकी केलेल्या सोन्याचे दागिन्याची लगड एकुण ११२ ग्रॅम एकुण १६,८०,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.श्री. सुदर्शन मुम्मका पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा.श्री. ईश्वर कातकडे. अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्री. अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर, श्री. प्रदिप पुल्लरवार, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन सावली, श्री. दिपक कांकेडवार सपोनि, श्री. बलराम झाडोकार सपोनि, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, श्री. विनोद भुरले पोउपनि, श्री. सचिन मुसळे पोउपनि, सफौ/धनराज करकाडे, पोहवा/चेतन गज्जलवार, पोहवा/सुरेद्र महतो, पोहवा/मोहन दासरवार, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, प्रफुल्ल गारघाटे, अजित शेन्डे, सुमित बरडे, धिरज पिदुरकर, अशोक मडावी, मिलींद टेकाम, गजानन मडावी यांनी केली. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व पोलीस स्टेशन सावली यांनी संयुक्तरित्या केली आहे.