
चंद्रपूर : सध्या सुरू असलेल्या आयपीएल (IPL 2026) क्रिकेट सामन्यांच्या पार्श्वभूमीवर, चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई करत ऑनलाईन क्रिकेट सट्टा खेळणाऱ्या एका तरुणाला रंगेहात पकडले आहे. ही कारवाई रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली असून, याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील :- दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामनगर परिसरात गस्तीवर असताना, गोपनीय माहिती मिळाली की रायतवारी कॉलरी रोडवरील दूध डेअरीसमोर एक तरुण मोबाईलवर ‘लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स’ या टी-२० सामन्यावर ऑनलाईन सट्टा घेत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष सापळा रचून प्रणय व्यंकटेश चिलकमवार (वय २४, रा. अहेरी, जि. गडचिरोली) याला ताब्यात घेतले. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता, तो nice7777 नावाच्या बेकायदेशीर वेबसाईटवर ‘आयडी’ वापरून पैशांची हार-जीत लावून सट्टा खेळत असल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान आरोपी प्रणय याने सांगितले की, त्याला ही ऑनलाईन सट्टा आयडी इरफान शेख (रा. अहेरी) याने पुरवली होती. या दोघांविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद
जप्त केलेला मुद्देमालः
मोबाईलः सॅमसंग कंपनीचा स्मार्ट फोन (किंमत अंदाजे २५,००० रुपये).
इतरः ऑनलाईन सह्याचे स्क्रीनशॉट आणि व्यवहाराच्या प्रती.
15068
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, यांचे नेतृत्वात पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार, पोलीस स्टॉफ पोहवा /सुभाष गोहोकार, पोहवा /सतिश अवथरे, पोहवा / रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा/दिपक डोंगरे, पोहवा/इम्रान खान, पोअं/हिरालाल गुप्ता, पोअं/किशोर वाकाटे, पोअं/शशांक बदामवार, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.