
चंद्रपूर : दिनांक 16/04/2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पो स्टे गडचांदुर हद्दीतील मुंबई इंडियन vs पंजाब किंग्स IPL सामन्यावर गडचांदुर येथे क्रिकेट सामन्यावर बेटिंग करीत आहेत अश्या प्राप्त माहितीवरुन रेड केली असता आरोपी क्रमांक 1) जुबेर रसूल सय्यद वय 22 वर्षे राहणार धुमनें ले आऊट गडचांदुर जि.चंद्रपूर हा माशा अल्लाह बिर्याणी सेंटर समोर, गडचांदुर येथे मुंबई इंडियन vs पंजाब किंग्स IPL सामन्यावर www.nice7777.fun या बेटिंग Id वर क्रिकेट सट्टा खेळताना मिळून आला.
त्याचेकडून एक मोबाईल किमती 20,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आला.
तसेच त्यास बेटिंग Id पुरवणारा आरोपी क्रमांक 2) रोहित काकडे रा. गडचांदुर याचे विरूद्ध पो. स्टे.गडचांदुर येथे अप. क्र. 261 /2026 कलम 12 (A) महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम, सहकलम 49 भा.न्या.सं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कारवाई राजुरा गडचांदुर उपविभाग,स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर यांनी केली आहे.