
बाबासाहेबांचा समानता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा संदेश समाजाला नवी दिशा देणारा: अमोल थेरे
घुग्घुस: येथील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मंगळवार, १४ एप्रिलला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त नगर सेवक विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनाखाली विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले तसेच सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना बाबासाहेबांनी दिली. जाती व्यवस्थेला लागलेली कीड नष्ट करणे हेच बाबासाहेबांचे ध्येय होते. दलित, शोषित, पिडित, वंचित आणि उपेक्षित समाजाचे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मोठया प्रमाणात शोषण केले जात होते हे बाबासाहेबांना मान्य नव्हते. समाजव्यवस्था ही स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय तत्वावर आधारित असावी असे बाबासाहेबांनी सांगितले. समानता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारा हा दिवस प्रत्येकासाठी प्रेरणादायी असून समाजाला नवी दिशा देतो. असे मनोगत भाजपाचे युवानेते अमोल थेरे यांनी व्यक्त केले.
यावेळी नगर सेवक निरीक्षण तांड्रा, नगर सेविका चैताली सातपुते, भाजपाचे युवानेते अमोल थेरे, गणेश कुटेमाटे, सिनू इसारप, कुसुम सातपुते, बबलू सातपुते, धनराज पारखी, सचिन नांदे, प्रणय काटवले, हेमंत कुमार, विक्की चिवंडे, योगेश घोडके, भाजपाच्या उषा आगदारी, शारदा पोनाला, कुसुम सातपुते, अमीना बेगम, शीतल आत्राम, भारती सोदारी, अल्का भंडारकर, पुनम मस्ते, सुनंदा सोदारी, संजिता सिद्दीकी, सुनंदा लिहीतकर, निखिल आत्राम, सतीश निभ्रड, हनुमान खडसे, खुशबू मेश्राम, जाई आत्राम, स्नेहा देवतळे आदींची उपस्थिती होती.