
चंद्रपूर : दिनांक 14/04/2026 रोजी पोलीस स्टेशन धाबा हद्दीत, चंद्रपूर येथे स्थानिक गुन्हे शाखा, राजूरा गडचांदूर पथकाने कारवाई करून दोन पिकअप वाहनातून अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करताना कारवाई केली. यामध्ये एकूण 26 नग गोवंशीय जनावरे आढळून आले.
सदर कारवाईदरम्यान 2 पिकअप वाहने 26 गोवंशीय जनावरे व 1 मोबाईल फोन असा अंदाजे ₹19,30,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर प्रकरणात खालील आरोपींचा समावेश आहे. बोलेरो पिकअप चालक विश्वास प्रकाश मांडवगडे, वय 22 वर्षे, व्यवसाय डायव्हर रा. इंदिरा नगर वार्ड गोडपिपरी ता. गोंडपिपरी जि. चंद्रपुर याला ताब्यात घेतले आहे तर फरार आरोपी सहचालक नामे क्रिष्णा ऊर्फ चिरकुट रा. बेबाळ ता. मुल. चालक रवि तोराम रा, लक्कडकोट ता. राजुरा, सहचालक श्याम मडावी रा. लक्कडकोट ता. राजुरा, समीर खान रा. राजुरा,अज्जु शेख रा. कागजनगर तेलंगाणा यांचा शोध सुरु आहे.
सदर आरोपींविरुद्ध कलम 11(1),(d) प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंध अधिनियम 1960, सहकलम 5, 5(A), 5(B), 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 (सुधारित 2015) सहकलम 119 म.पो. का. तसेच, गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई राजूरा गडचांदूर उपविभाग स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.