
घुग्घुस : येथील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात ६ एप्रिलला भाजपा स्थापना दिनानिमित्त नगर सेवक विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचा भगवा फडकला.
याप्रसंगी प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे यांच्या हस्ते भाजपाचा ध्वज फडकविण्यात आला.
मनोगत व्यक्त करतांना प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे म्हणाल्या, दरवर्षी ६ एप्रिलला भाजपाचा स्थापना दिवस साजरा केला जातो. ६ एप्रिल १९८० रोजी अधिकृतपणे भाजपाची स्थापना झाली. भाजपाने १९८४ मध्ये केवळ दोन जागांवरून सुरुवात करून, आज देशातील आणि जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनण्यापर्यंतचा टप्पा गाठला आहे. भाजपा एक परिवार आहे आणि तो ‘राष्ट्र प्रथम’ व ‘अंत्योदय’ या सिद्धांतांवर कार्य करतो.
यावेळी प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, नगर सेवक निरीक्षण तांड्रा, भाजपा नेते अमोल थेरे, नगर सेविका चैताली सातपुते, युवानेते गणेश कुटेमाटे, नितु चौधरी, सुषमा सावे, बबलू सातपुते, विनोद चौधरी, सिनू इसारप, चंद्रकला मन्ने, निशा उरकुडे, प्रीती धोटे, धनराज पारखी, असगर खान, सचिन नांदे, सुनंदा लिहीतकर, हनुमान खडसे, भारती पर्ते, जाई आत्राम, खुशबू मेश्राम, प्रिया नागभीडकर, अजय लेंडे व मोठया संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.