
चंद्रपूर : बहुजन समाज पार्टीच्या चंद्रपूर जिल्हा, विधानसभा तसेच सेक्टर पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी, रविवार, PWD गेस्ट हाऊस, चंद्रपूर येथे यशस्वीरीत्या संपन्न झाली.
ही बैठक बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. अँड. सुनीलजी डोंगरे साहेब यांच्या आदर्शानुसार, झोन प्रभारी मा. डॉ. मोहनजी राईकवार साहेब यांच्या दिशानिर्देशनानुसार तसेच प्रदेश सचिव व जिल्हा इन्चार्ज मा. महेंद्रजी मकेश्वर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीमध्ये पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या मतांचे व सूचनांचे मांडणी करत संघटन वाढीसाठी आवश्यक असलेल्या विविध मुद्द्यांवर आपले विचार व्यक्त केले.
यावेळी मा. डॉ. मोहनजी राईकवार साहेब यांनी पक्षाच्या भविष्यातील कामकाजासाठी स्पष्ट रोडमॅप व उद्दिष्टे निश्चित करून दिली. त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना १० एप्रिल २०२६ पूर्वी निश्चित करण्यात आलेली उद्दिष्टे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच, या उद्दिष्टांच्या पूर्ततेचा आढावा घेण्यासाठी पुन्हा बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री धर्मेशजी निकोसे यांची चंद्रपूर लोकसभा प्रभारी म्हणून पदोन्नती करण्यात आली.